आकुर्डीत रक्तदान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १२६ नागरिकांचे रक्तदान

आकुर्डीत रक्तदान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १२६ नागरिकांचे रक्तदान

आकुर्डी : कै. आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान स्पर्धेला नागरिक आणि विविध सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात तब्बल १२६ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.

मंडळांच्या रक्तदानातील सहभागाच्या आधारे भैरवनाथ मित्र मंडळ, आकुर्डी गाव यांनी प्रथम क्रमांक पटकावत २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. तेज मित्र मंडळ, दत्तवाडी यांनी द्वितीय क्रमांकासह १५ हजार रुपये, तर जगदंब प्रतिष्ठान यांनी तृतीय क्रमांकासह ७ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. 


रक्तदात्यांसाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये आकुर्डी येथील रितेश गायकवाड यांनी एक ग्रॅम सोन्याचे नाणे, तर ताथवडे येथील मयूर पवार यांनी सायकल जिंकली. या उपक्रमासाठी संजीवनी ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, उद्योजक अमित बाबर, आयुष निंबारकर, पायल ज्वेलर्स दत्तवाडी आणि स्काय ब्लू हॉटेल यांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले. यावेळी उद्योजक उमेश चांदगुडे, प्रसाद शेट्टी,  क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसेविका वैशालीताई काळभोर,  नगरसेविका शैलजाताई मोरे, अमित बाबर, कुणाल लांडगे, बाबूभाई शेट्टी, रणजित सोलंकी, जालिंदर काळभोर, महेश काटे, नानासाहेब पिसाळ, नितीन काकडे, अशोक माने यांच्यासह संजय जगताप, समर्थ जगताप, प्रमोद शेट्टी आणि गिरीश शेट्टी उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इखलास सय्यद, रमेश भोरकर, अभिजित पिसाळ, शाहरुख शेख, जावेद पठाण, सूरज मोरे, शुभम वरकुड, अमोल जैस्वार, निलेश कदम, सनी गोडसे, समाधान आणि दाजी चोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले, तर सुनील मोरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories