चाकणमध्ये पार्किंगमधून दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

चाकणमध्ये पार्किंगमधून दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : खेड तालुक्यातील चाकण परिसरातून दुचाकी चोरीची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका अज्ञात चोरट्याविरोधात उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरातील एकतानगर येथील मीना रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी नवनाथ बाळू भुले (वय 40, रा. चाकण) यांनी तक्रार दाखल केली आहे.भुले यांनी आपली बजाज प्लॅटिना दुचाकी पार्किंगमध्ये हँडल लॉक करून उभी केलीली बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. 

17 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 8.45 वाजल्यापासून ते 19 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 8.30 च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. चोरीस गेलेल्या दुचाकीचा नोंदणी क्रमांक MH14FV1160 आहे.

या प्रकरणी 20 नोव्हेंबर 2026 रोजी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS)कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याने तक्रारदाराच्या संमतीशिवाय दुचाकी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलीस हवालदार गवारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories