पिंपरी-चिंचवड : ऑनलाइन खरेदी-विक्रीच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असाताना जुनी कार खरेदी करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबर 2026 ते १७ ऑक्टोबर 2026 च्या कालावधीत हा प्रकार घडला. तक्रारीनुसार, आशिष अरुण बढे (वय 28) याला आपल्या वडिलांसाठी जुनी चारचाकी खरेदी करायची होती. त्यासाठी त्याने ओएलएक्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गाड्या पाहण्यास सुरूवात केली.
यावेळी आरोपी निलेशला मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार विक्रीसाठी असल्याची जाहिरात दिसली. त्यानंतर त्याने जाहिरातीतल संबंधित नंबरवर संपर्क साधला. यावेळी त्याच्याकडे कार घेण्यासाठी 75 रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, पैसे पाठवल्यानंतर कार मिळाली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारदार निलेशने वारंवार फोन करून कार कधी देणार विचारल्यानंतर त्याला कारचा टॅक्स भरण्यास सांगून आणखी पैशांची मागणी केली. यामुळे तक्रारदार निलेशने पुढील पैसे देण्यास नकार दिला. तसेच आधी दिलेले पैसे परत मागितले. मात्र आरोपीने पैसे देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निलेशने पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी 20 नोव्हेंबर 2026 रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(सी) आणि 66(डी) अन्वये गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्ष पवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.