पिंपरी-चिंचवडमध्ये किरकोळ वादातून मारहाण; दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल

पिंपरी-चिंचवडमध्ये किरकोळ वादातून मारहाण; दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल

पिंपरी-चिंचवड : शहरात किरकोळ वादातून मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. काळेवाडीतील रहाटणी परिसरात सोसायटीच्या पार्किंगमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून एका व्यक्तीला काठीने मारहाण करण्यात आली. तर खेड तालुक्यातील चिंबळी येथे गाडीच्या भाड्यावरून झालेल्या वादातून चालकावर दगडाने हल्ला करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काळेवाडीत पार्किंगच्या वादातून मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  19 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 8.30च्या सुमारास काळेवाडीतील रहाटणी परिसरात ही घटना घडली. परिसरातील जे. एम. इस्टेट हाऊसिंग सोसायटीच्या गेटवर पार्किंगच्या वादातून आरोपीला मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे. तक्रारदार आणि आरोपी एकाच सोसासटीतील आहे.  संदीप दळवी (वय 41) असे तक्रारदाराचे नाव असून त्यांनी सोसायटी सचिव सातप्पा बरगे (वय 48) यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपीमध्ये सोसायटीच्या पार्किंगमध्ये चारचाकी गाडी लावण्यावरून वाद झाला. हा वाद एवढा वाढला की तक्रारदाराला मारहाण करण्यात आली. तक्रारीनुसार, आरोपीने सोसायटीच्या गेटवरील वॉचमनच्या खोलीतील काठीने मारहाण केली. मारहाणीत तक्रारदाराच्या उजव्या हाताच्या अंगठ्याखालील तळहाताला, मनगटाला तसेच डोक्याला दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच आरोपीने तक्रारदाराला, 'तुझी गाडी पार्क केलेल्या ठिकाणावरून काढ, नाहीतर उद्या तुझ्या गाडीची काच फोडून टाकेन,' अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. 

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्ष नाईक निंबाळकर करत आहेत.

चिंबळीत भाड्याच्या वादातून चालकावर हल्ला

खेड तालुक्यात चिंबळी येथे गाडीच्या भाड्यावरून झालेल्या वादात चालकावर हल्ला करण्याच आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एकाविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात चालकाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार स्वप्निल सोनकांबळे (वय २४, रा. भोसरी) हे हे माऊली कृपा ट्रान्सपोर्ट कंपनी, चिंबळी येथे गाडी भरण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी गाडीच्या भाड्यावरून आरोपी रविंद्र तुकाराम मांडे (वय ३७, रा. डोंगरकिन्ही, बीड) याच्याशी त्याचा वाद झाला.

या वादातून आरोपी रविंद्र यांने तक्रारदार स्वप्निल याला शिवीगाळ केला. नंतर जवळच पडलेला दगडाने त्याला जोरात मारले. या हल्ल्यात स्वप्निलच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. 

या प्रकरणी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजून ६ मिनिटांनी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३५२ तसेच भादंवि कलम ३२६, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories