महापालिकेची धडक कारवाई ; दोन अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

महापालिकेची धडक कारवाई ; दोन अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. अजमेरा सोसायटी रोड आणि नेहरूनगर परिसरातील अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन ठिकाणची सुमारे 1 हजार 450 चौरस फुटांची अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (20 नोव्हेंबर) महापिलेकेने अजमेरा सोसायटी रोड व नेहरूनगर परिसरातील अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामांमुळे निर्माण झालेल्या अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला.

आयुक्त विजय सूर्वंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तर क क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या धडक कारवाई पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

या मोहिमेत बीट निरीक्षक प्रतिका चौरंगे, सौरभ शिरसाठ, इम्रान पठाण आणि दत्तात्रय छडीदार यांच्यासह 19 एम.एस.एफ. जवान, 6 मजूर, 1 जेसीबी आणि 1 क्रेन यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाकडून पुढेही अशाच प्रकारची कारवाई सुरूच राहणार आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories