घराचा दरवाजा उघडा ठेवणं पडलं महागात ; ३३ हजारांचा फोन घेऊन चोरटा पसार

घराचा दरवाजा उघडा ठेवणं पडलं महागात ; ३३ हजारांचा फोन घेऊन चोरटा पसार

पिंपरी-चिंचवड : वाल्हेकरवाडी परिसरात घरात घुसून हजारांचा मोबाईल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (20 नोव्हेंबर) रोजी सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली. वाल्हेकरवाडी येथील येथील सरोवर हाउसिंग सोसायटी परिसरातील घरात ही चोरी झाली. एका चोराने घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून घरात प्रवेश केला. यानंतर त्याने तेथील सुमारे ३३ हजार रुपये किमतीचा मोबाईल उचलला आणि तिथून पळ काढला.  

या प्रकरणी शिवतेज हनुमंत तांबे (वय २२) यांनी चिंचवड पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, घराचा दरवाजा उघडा राहिल्याने अज्ञात व्यक्तीला चोरीची संधी मिळाली. त्याने गुपचूप घरात घुसून आणि तक्रारदाराच्या संमतीशिवाय ३३ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला.

आपला मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच तांबे यांनी पोलिसांत धाव घेतली.  या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्ष खेतले तपास करीत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories