व्हॉट्सॲपवरील मेसेज अन् कॉल पडले महागात; दोन प्रकरणांत ५४.६४ लाखांची फसवणूक

व्हॉट्सॲपवरील मेसेज अन् कॉल पडले महागात; दोन प्रकरणांत ५४.६४ लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड | २७ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमध्ये व्हॉट्सॲपद्वारे फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाकडमध्ये एका एका कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲपवर कंपनीच्या संचालकाच्या नावाने पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे, बावधनमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सॲप कॉलवरून परकीय चलनात गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकरणांत ५४ लाख ६४ हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची तक्रार असून २६ नोव्हेंबर रोजी संंबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप मेसेजवरून ३० लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबरला सकाळी ११.३५ ते सायंकाळी ५च्या दरम्यान वाकडच्या वेणूनगरमधील एका कार्यालयात हा प्रकार घडला. नबीराज स्वामीनादन (वय ३६, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांना कंपनीचे संचालक आनंद मोहगावकर यांच्या नावाने व्हॉटसॲपवर बनावट संदेश पाठवण्यात आला. त्यांना मेजेसवर एका बँक खात्यात ३० लाख रुपये जमा करण्यास करण्यास सांगून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

वाकड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(सी), ६६(डी) नुसार गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.

व्हॉट्सॲप गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखांचा गंडा

दुसरीकडे, बावधनमध्ये १७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान व्हॉट्सॲपवर गुंतवणूकीचे आमिष दाखलवून एका जेष्ठ नागरिकाला लाखांचा गंडा लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबू राजेंद्र राघवेंद्रराव हेजीब (वय ८२, रा. अथश्री सोसायटी, बावधन) यांना तीन अनोळखी मोबाइल क्रमांकांवरून व्हॉट्सॲप कॉल आले. फोन करणाऱ्यांनी ‘Xtrade’च्या नावाने परकीय चलनाच्या व्यवहारात पैसे गुंतवण्यास सांगितले. या बहाण्याने वेळोवेळी २४ लाख ६४ हजार ३१५ रुपये ११ पैसे घेतल्याचे हेजीब यांनी तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी बावधन पोलिसांत तीन अनोळखी क्रमांकधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(सी), ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बत्तिशे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories