तळेगावात कारची महिलेला जोरदार धडक ; अज्ञातावर गुन्हा दाखल

तळेगावात कारची महिलेला जोरदार धडक ; अज्ञातावर गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे | २७ नोव्हेंबर २०२६ : तळेगाव दाभाडे परिसरात घरी पायी निघालेल्या एका महिलेला रस्ता ओलांडताना कारने धडक दिली. या अपघातात महिला जखमी झाली. या प्रकरणी संबंधित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.४५च्या सुमारास मारुती मंदिर चौकाजवळ, वेदरकर क्लिनिकसमोर हा अपघात घडला. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या घरी पायी जात असताना रस्ता ओलांडताना बेटी बचाव पुतळ्याकडे येत असलेल्या एका चारचाकी वाहनचालकाने त्यांना धडक दिली. 

वाहन चालक रस्त्याच्या परिस्थितीकडे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या धडकेत महिला जखमी झाली असून तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १८४, १३४(अ) व १३४(ब) नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार साबळे तपास करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories