पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोडींत अपघात ; मागून आलेल्या वाहनाची कारला धडक

पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोडींत अपघात ; मागून आलेल्या वाहनाची कारला धडक

भोसरी | २७ नोव्हेंबर २०२६ : पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीदरम्यान थांबलेल्या एका कारला मागून आलेल्या गाडीने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारमध्ये बसलेल्या महिलेला दुखापत झाली असून तिला मोशीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३च्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील विक्रांत नर्सरीसमोर हा अपघात झाला. किशोर भाऊसाहेब पोटे (वय ३३, रा. बनकर वस्ती, मोशी) हे आपली पत्नी आणि मुलासह आळंदीला निघाले होते. यावेळी वाहतूक कोंडीत त्यांची कार थांबली असताना भगवान नारायण वाजे (वय ४५, रा. आळंदी देवाची) यांच्या वाहनाने पोटे कुटुबांच्या कारला मागून धडक दिली.

वाजे यांच्यावर वाहतूक कोंडीत असताना भरधाव वेगात आणि बेदरकारणे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत कार चालवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.  या धडकेमुळे पोटे यांच्या कारच्या मागील बंपर आणि डिक्कीचे नुकसान झाले. तसेच पोटे यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा ड्रायव्हर शीटच्या शेजारील कोड्रायव्हर सीटवर बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या पत्नीचे डोके कारच्या डॅशबोर्डवर आदळल्याने त्यांना दुखापत झाली. त्यांच्या नाकातुन रक्त येऊ लागले.

यानंतर पोटे यांनी पत्नीला मोशीतील रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान पोटे यांच्या पत्नीचे डोके कारच्या डॅशबोर्डवर धडकल्याने मेंदुला सुज आल्याचे आणि नाकाला मार लागल्यामुळे किरकोळ दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २६ नोव्हेंबरला वाजे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ), ३२४(४) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, ११९, १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार रोकडे याचा  तपास करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories