'आमच्या वडिलांना का मारलं?' म्हणत तरुणाला मारहाण; तळेगावात राडा!

'आमच्या वडिलांना का मारलं?' म्हणत तरुणाला मारहाण; तळेगावात राडा!

तळेगाव दाभाडे | २७ नोव्हेंबर २०२६ : वडिलांना मारल्याचा आरोप करत तीन जणांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेत घडली आहे. या मारहाणीत तरुण जखमी झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३०च्या सुमारास तळेगाव दाभाडेतील नवमी हॉटेल येथील पानटपरीवर हा प्रकार घडला. राहुल राकेश मोरे (वय ३०, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार दिलीप बनसोडे (वय अंदाजे ५७), अजय बनसोडे (वय अंदाजे ३२) आणि गणेश बनसोडे (वय अंदाजे २९, तिघे रा. संभाजीनगर, तळेगाव दाभाडे) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल मोरे यांनी दिलीप बनसोडे यांना मारल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप खोटा असल्याचे मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या कारणावरून आरोपींनी मोरे यांना फायबरच्या दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मोरे जखमी झाले. याशिवाय आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी २६ नोव्हेंबरला भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार पुढील चव्हाण तपास करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories