पिंपरी | २७ नोव्हेंबर २०२६ : पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आह. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांत दोघांसह इतरांविरोधत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हॉटेल कर्मचारी आणि ग्राहकांना धमकवल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४५ सुमारास पिंपरीत येथील साई चौकातील खुशबू हॉटेलमध्ये ही घटना घडली. अजय ऊर्फ जिमी उदय सिंग (वय ३४, रा. इंदिरानगर, पिंपरी) याने ही तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, अजय सिंग खुशबू हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. यावेळी जेवण करत असतान आरोपी मोनू बहोत (वय अंदाजे २७, रा. कैलासनगर, पिंपरी) आणि अक्षय हजारे (वय अंदाजे २५, रा. पिंपरी) हे इतरांसह हॉटेलमध्ये आले.
यानंतर त्यांनी जुन्या भांडमालवरून सिंग यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. अक्षय हजारे याने अजय सिंगवर कोयत्याने डाव्या गालावर वाल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार घडत असताना हॉटेलचे व्यवस्थापक, कर्मचारी आणि ग्राहकांची गर्दी जमली होती. वादात पडल्यास त्यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर आरोपी तिथून निघून गेले.
या प्रकरणी २६ नोव्हेंबर रोजी पिंपरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(१), ३५२, ३(५), शस्त्र कायद्याच्या कलम ४, २५, २७, महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१)(३) सह १३५ आणि फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियमाच्या कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक इंगळे तपास करत आहेत.