हृदयद्रावक! मोशीत शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू

हृदयद्रावक! मोशीत शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू

मोशी | २६ नोव्हेंबर २०२६ : मोशीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या मामा आणि भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीतील बनकर वस्ती परिसरात बुधवारी (२५ नोव्हेंबर) सायंकाळी ६.४५ ते ७ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. सिद्धांत उत्तम लगाडे (वय २१) आणि रितेश रमेश ताकपेरे (वय १२) अशी मृतांची नावे आहेत. 

मोशीतील बनकर वस्ती परिसरातील तुलसी रत्न सोसायटीजवळ असलेल्या शेततळ्यात सिद्धांत आणि रितेश हे दोघे मामा-भाचे पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पोहत असताना दोघेही पाण्यात बुडाले.

घटनेनंतर दोघांना उपचारासाठी साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री ८ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने बनकर वस्ती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories