पुढील चार आठवड्यांत देशभरात पावसाची जोरदार हजेरी, हवामान विभागाचा अंदाज
पुणे, ता. १४ - मॉन्सूनच्या आगमनासाठी आपल्या देशात अनुकूल वातावरणनिर्मिती होत आहे. पुढील चार आठवड्यांत देशभरात पावसाची जोरदार हजेरी लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पहिल्या आठवड्यापासून पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडेल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून दक्षिण-मध्य भारत, पूर्व किनारपट्टी, ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल परिसरातही पावसाची चांगली नोंद होईल. महाराष्ट्राच्या किनारी भागांसह अंतर्गत भागांमध्येही पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
चार आठवड्यांचा अंदाज असा.....
जूनचा पहिला आठवडा - केरळ, किनारी कर्नाटक, अरबी समुद्र परिसर आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज
दुसरा आठवडा - केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये आणि ईशान्य भारतात जोरदार पाऊस
तिसरा आठवडा - महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगडसह देशाच्या बहुतांश भागांत पाऊस.राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये तुलनेने कमी पाऊस
चौथा आठवडा - महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता. मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि लगतच्या भागांतही पाऊस बरसणार