रासायनिक फेसाने भरलीये पवना नदी, प्रशासनाच्या निष्क्रियेतवर नागरीकांचा तीव्र संताप

रासायनिक फेसाने भरलीये पवना नदी, प्रशासनाच्या निष्क्रियेतवर नागरीकांचा तीव्र संताप

रासायनिक फेसाने भरलीये पवना नदी, प्रशासनाच्या निष्क्रियेतवर नागरीकांचा तीव्र संताप

पिंपरी, ता. १५ - अधिकारी व मत्र्यांनी भेट देऊन पाहणी करुनही, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. गुरुवारी सकाळी केजूदेवी बंधारा ते थेरगाव विसर्जन घाट परिसरात  नदीच्या पाण्यावर पांढऱ्या फेसाचे थर साचल्याचे धक्कादायक चित्र दिसले. प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

यापूर्वीही विषारी प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडले होते. तसेच पवना नदीत मांसाची गाठोडी टाकल्याचा प्रकारही उघडकीस आला होता. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापौर रवी लांडगे यांनी नदी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला, अधिकाऱ्यांनी अनेकदा पाहणी केली, काही महिन्यांपूर्वी राज्यमंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील अधिकाऱ्यांसमवेत शहरातील नदी प्रदूषणाची पाहणी करुन, बैठक घेतली. नदीत प्रक्रीया न केलेले रासायनिक सांडपाणी नदीत सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, हे सर्व वरवरचेच दिसून येत आहे. 

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ नोटिसांचा फार्स केला जात असल्याची टीका नागरीकांनी केली आहे. पर्यावरण विभागाकडून नमुने घेण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संतापले आहेत. पवना नदीचे प्रदूषण हे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आणणारे आहे, त्यामुळे तातडीने दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असे नागरीकांनी म्हटले आहे.  

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories