मुसळधार पावसामुळे भीमाशंकर अभयारण्यातील धोकादायक पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद

मुसळधार पावसामुळे भीमाशंकर अभयारण्यातील धोकादायक पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद

मुसळधार पावसामुळे भीमाशंकर अभयारण्यातील धोकादायक पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद 

 पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - मुसळधार पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी भीमाशंकर अभयारण्यातील धोकादायक पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती भीमाशंकर अभयारण्य वनपरिक्षेत्र क्र. १ चे वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांनी दिली. यामध्ये कोंढवळ धबधबा, नागफणी पॉईंट, कोकण कडा तसेच अभयारण्यातील इतर धोकादायक ठिकाणांचा समावेश आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्देशानुसार, तसेच हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात सध्या संततधार पाऊस सुरू असल्याने दरडी कोसळण्याचा, घसरून अपघात होण्याचा, तसेच अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेल्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, त्याचबरोबर वनविभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. 

परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षितता सुनिश्चित झाल्यानंतरच ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी पुन्हा खुली करण्यात येतील, असेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories