पिंपरी-चिंचवड शहरात वीज व पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरण व महापालिका प्रशासनाची महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक

पिंपरी-चिंचवड शहरात वीज व पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरण व महापालिका प्रशासनाची महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक

पिंपरी-चिंचवड शहरात वीज व पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरण व महापालिका प्रशासनाची महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक

पिंपरी, ता. २२ जुलै २०२६ - पावसाळ्यात नागरिकांना वीज व पाणी पुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू नये, यासाठी स्थायी समितीच्या वतीने महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. या बैठकीत रावेत, वाल्हेकरवाडी, रहाटणी तसेच शहरातील विविध भागांतील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत महावितरण व मनपाच्या सर्व संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या, "पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी आणि नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची त्वरित दखल घेऊन तत्काळ निवारण करावे." तसेच महानगरपालिकेच्या वतीने महावितरणला सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

या बैठकीस महापौर रवी लांडगे, सत्तारुढ पक्षनेता प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे तसेच महावितरणचे मुख्य अभियंता  सुनील काकडे, अधीक्षक अभियंता  आदित्य गायकवाड, कार्यकारी अभियंता  सोमनाथ मुंडे,  लहानू विश्वनाथ व महावितरणचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


📌 बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली -

१) वीज पुरवठा अखंडित राखणे : रावेत व परिसरातील नागरिकांचा वीज पुरवठा ४ ते ६ दिवस बंद राहण्याच्या प्रकारांवर कडक नाराजी व्यक्त करत, भविष्यात अशा प्रसंगी तत्काळ आपत्कालीन पर्याय उपलब्ध करणे.

२) पाणी पुरवठा पंप हाउस: मनपाच्या पाणी पुरवठ्याच्या पंप हाउसचा वीज पुरवठा (चिंचवड पीसीएमसी, रहाटणी व MIDC) कोणत्याही परिस्थितीत बाधित होणार नाही याची दक्षता घेणे.

३) फिडर पिलर व RMU सुरक्षा : महावितरणचे फिडर पिलर व RMU पाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करणे.

४) इतर मागण्या : PD मीटर व नवीन मीटर जोडणी, रस्ता खुदाई करताना मनपाशी समन्वय, फिडर पिलर झाकणे बसवणे आणि अंदाजपत्रके वेळेत उपलब्ध करून देणे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories