हिंजवडीत प्रेमाचा रक्तरंजित अंत ; प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या

हिंजवडीत प्रेमाचा रक्तरंजित अंत ; प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या

पिंपरी-चिंचवड : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादात प्रियकराने प्रेयसीला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना हिंजवडीत परिसरात घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सोमवारी (२३ नोव्हेंबर) मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान हिंजवडीतील साखरेवस्ती येथे प्रिस्टीन पीजीमधे ही घटना घडली. कोमल राजेंद्र डहाके (वय २७ वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी अक्षय दिलीपराव भोंग (वय ३४) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यानुसार शुभम ज्ञानेश्वर काळबांडे (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम हा मूळचा हिंगोली जिल्ह्यातील सेनगावचा रहिवासी असून तो साखरेवस्ती परिसरात गजानन पीजीमध्ये राहतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि कोमल यांचे प्रेमसंबंध होते. शुभमचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान शुभमने कोमलला भिंतीवर आणि बेडवर आपटले. तसेच तिच्या चेहऱ्यावर हाताने आणि बुक्क्यांनी मारहाण करून तिची हत्या केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वांगणेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.  

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories