पिंपरी-चिंचवडकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी-चिंचवडकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळीही पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वर्तविली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सेक्टर क्रमांक २३ येथील तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये स्थापत्य आणि विद्युत विषयक आवश्यक कामांचा समावेश आहे. ही कामे करण्यासाठी गुरुवारी निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे शहरातील सर्व भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून, गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन आपल्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरेसा साठा अगोदरच करून ठेवावा.

दरम्यान, देखभाल-दुरुस्तीच्या कामानंतर शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा आवश्यकतेनुसार आणि जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories