खेडमध्ये दुचाकी चोरट्यांचा डल्ला; 90 हजारांची होंडा शाईन लंपास

खेडमध्ये दुचाकी चोरट्यांचा डल्ला; 90 हजारांची होंडा शाईन लंपास

पिंपरी-चिंचवड : खेड तालुक्यातून दुचाकी चोरीची घटना समोर आली आहे. खराबवाडी येथील हॉटेल शिवराजसमोर पार्क केलेली हजारो रुपये किमतीची दुचाकी एका अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूचरण रोहिदास अभंगे (वय 24) हे निगडी, पुणे येथे भाड्याने राहतात. 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 5.30 ते दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान खेड तालुक्यातील खरबवाडी येथील शिवराय हॉटेलसमोर ही घटना घडली.

गुरूचरण अभंगे यांनी आपली ९० हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी शिवाराय हॉटेलसमोर उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली.

या प्रकरणी गुरूचरण अभंगे यांनी 21 नोव्हेंबर 2026 दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 (2) अन्वये आणि भादवि कलम 379 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सावंत अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories