विशालनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर हल्ला; 3 तोळ्यांची सोनसाखळी हिसकावल्याचा आरोप

विशालनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर हल्ला; 3 तोळ्यांची सोनसाखळी हिसकावल्याचा आरोप

विशालनगर | 8 सप्टेंबर 2026 : जुन्या वादाचा राग मनात धरून हॉटेल व्यावसायिकाला पार्किंगमध्ये अडवत मारहाण करून त्यांच्या गळ्यातील अंदाजे 3 तोळ्यांची सोनसाखळी हिसकावल्याची घटना विशालनगरमध्ये घडली. याप्रकरणी चौघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल अण्णासाहेब वीर (वय 33, व्यवसाय—हॉटेल) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संध्यानगरी बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये घडली.

तक्रारीनुसार, आरोपींनी जुन्या वादातून फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी वस्तू, बॉटल आणि दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. मारहाणीदरम्यान एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 511/2026 नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories