लुडो खेळण्यावरून वाद ; तरुणाला दगडाने मारहाण

लुडो खेळण्यावरून वाद ; तरुणाला दगडाने मारहाण

पिंपरी : मोशीतील शिवाजीवाडी परिसरात लुडो खेळाण्यासाठी सोबत न घेतल्याच्या कारणारून झालेल्या वादात एका तरुणाला दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून, याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.15च्या सुमारास स्वामी समर्थ हॉटेलजवळ ही घटना घडली. वर्षा वानखेडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, तिचा भाऊ तुकाराम गंगाराम शिंदे (वय 27) याने आरोपी अनिल प्रल्हादराव देशमुख (वय 26) याला लुडो खेळण्यासाठी सोबत घेतले नाही. याचा अनिलने मनात राग धरला होता. 

लुडो खेळण्साठी न घेतल्याने अनिला राग आला आणि त्याने रागात मला आताच खेळायला घे असे म्हणत तुकारामला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच त्याच्या डोक्याला, कमरेला आणि डाव्या पायाच्या पोटरीवर दगडाने मारहाण करून जखमी केले. 

या मारहाणीत तुकाराम शिंदे जखमी झाले असून, या घटनेप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352 तसेच नमूद भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस हवालदार जाधव या घटनेचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories