माथाडी कामगारांकडून  ५० किलोपेक्षा अधिक वजन उचलून घेण्यास प्रतिबंध

माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजन उचलून घेण्यास प्रतिबंध

माथाडी कामगारांकडून  ५० किलोपेक्षा अधिक वजन उचलून घेण्यास प्रतिबंध 

पुणे, ता. ९ - आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करुन घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. 

माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी दिलेल्या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. 

माथाडी कामगार आणि व्यापारी संघटनांमध्ये याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी टाळण्याबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपर्यंतच वजनाची हाताळणी करण्याबाबत परिपत्रक काढले जाणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. तसेच इतर राज्यांमध्येही या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाईल, असे मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी सांगितले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories