धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने मेणबत्त्या प्रज्वलित करत शहर काँग्रेसने साजरा केला विजयोत्सव

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने मेणबत्त्या प्रज्वलित करत शहर काँग्रेसने साजरा केला विजयोत्सव

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने मेणबत्त्या प्रज्वलित करत शहर काँग्रेसने साजरा केला विजयोत्सव 

पिंपरी, ता. २६ जुलै २०२६ - केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या कबुलीने आणि नियमानुसार अधिकाधिक आर्थिक मोबदला देण्याचे कबूल केल्याने हा संविधानाचा, विद्यार्थी आंदोलनाचा आणि न्यायाचा विजय झाला म्हणून मेणबत्त्या प्रज्वलित करत विजय मार्च संबोधत करत पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसकडून शनिवारी (ता. २५) आनंद व्यक्त करण्यात आला.  

याप्रसंगी बोलताना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, "आपण शिकलेले लोक आवाज करू लागलो म्हणून यांनी सरकारी शाळा बंद करत खाजगी शाळा सुरू केल्या, या प्रधान याने ओएनजीसी मधील सातशे कोटी रुपये संघ परिवारातील मित्रांना दिले, दुसऱ्या बाजूला गरिबांची मुले आई-वडिलांच्या काबाडकष्टावर मोठ्या परीक्षांना सामोरे जातात त्याचे पेपर फोडून त्यांना नाउमेद करायचे काम सध्या मोदी सरकार करत आहे, प्रधान यांची मुलगी बोस्टन मध्ये लॉ स्कूलमध्ये शिकते त्यांना तुमच्या शिक्षणाची काळजी नाही, त्यांनी स्वातंत्र्याला, मुलींच्या शिक्षणाला, आरक्षणाला, बाबासाहेबांना, संविधानाला विरोध केला ती मंडळी काहीच नीट करू शकत नाहीत, म्हणून माझे सर्वांना आवाहन आहे की घराघरात बसलेल्या माझ्या माता, भगिनी, भाऊ मुलाबाळांसह रस्त्यावर या, या मोदीला घालवल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही, मोदीचा राजीनामा पाहिजे तो होईल, मात्र सगळ्यांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे, तरुणांनी विशेषता आले पाहिजे आपल्या आई वडिलांनाही आणले पाहिजे"  असे कोळसे पाटील म्हणाले.

"न्याय विजय या अक्षरांच्या मेणबत्त्या प्रज्वलित करत हा न्याय विजय आहे असे संबोधत काँग्रेस पक्षाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे, हा न्याय विजय आम्ही देशाच्या आंदोलक विद्यार्थ्यांना, युवकांना आणि राहुल गांधी यांच्या सक्षम नेतृत्वाला समर्पित करत आहोत"असे काँग्रेसचे शहराध्यक्ष बनसोडे म्हणाले.

या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, प्रदेश क्रीडा विभागाच्या अध्यक्षा समिता गोरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव स्वप्नील बनसोडे, प्रदेश विचार विभागाचे युवक अध्यक्ष राहुल शिंपले, प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव गौतम आरकडे,सेवा दलाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला नेत्या स्वाती शिंदे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस करण गील, आप्पासाहेब सोनवणे, माजी सरचिटणीस हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, हरीश डोळस, कुणाल भोसले, विवेक विधाते, विल्यम साळवी, सिद्धार्थ वानखेडे, युवराज पवार, अमोल कुडे, अकबर शेख, मोहम्मद कबीर, समरीन कुरेशी, आर्या बोचकुरे, मागासवर्गीय विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, जितेंद्र छाबडा, राजू वाल्मिकी, नितीन सोनवणे, रितिका शर्मा, वैशाली पवार, विलास सकट, बाबा गायसमुद्रे, नासिर चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.










Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories