महानगरपालिकेकडून नागरिकांमध्ये डेंग्यूबाबत जागृती
पिंपरी, ता. २६ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांमध्ये डेंग्यूबाबत जागृती करण्यात येत आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने नेहरुनगर येथील पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल, आला हजरत इमारती अहमद रजा उर्दू प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ सर्वेक्षण - २०२६ तसेच 'सफाई अपनाओ, बीमारी भगाओ' अभियानांतर्गत डेंग्यूचे दुष्परिणाम, लक्षणे व कराव्या लागणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत वैद्यकीय पथकाने चिंचवड परिसराची पाहणी करून साचलेल्या पाण्याची तपासणी केली, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट केली, पाणी साठवणुकीच्या ठिकाणांची तपासणी केली तसेच नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आदी कीटकजन्य आजारांची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देत माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले.