कासारवाडी येथील आयटीआयमध्ये महिला व मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू, ४ ऑगस्ट अंतिम तारीख
कासारवाडी येथील आयटीआयमध्ये महिला व मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू, ४ ऑगस्ट अंतिम तारीख
पिंपरी, ता. २६ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथील आयटीआयमध्ये महिला व मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑगस्ट २०२६ आहे. इयत्ता १० वी उत्तीर्ण मुली व महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे महापालिकेने सांगितले आहे.
कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI)महिला व मुलींकरिता इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅड प्रोग्रामिंग असिस्टंट,डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर, कॉस्मेटोलॉजी, फॅशन डिझाईन अॅड टेक्नॉलॉजी, हॉस्पिटल हाऊसकीपिंग हे अभ्यासक्रम आहेत. कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी
किमान वय १४ वर्षे ही वयाची अट आहे. कमाल वयाची अट नाही.
सविस्तर माहितीसाठी, 'औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), रेल्वे गेट खाली, सरिता कुंज अपार्टमेंट जवळ, पिंपळे गुरव रोड, ह प्रभाग, कासारवाडी, पुणे-३४' संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - ७७२२०१०७२० / ८८०५०००८६६