महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे महापालिका भवनामध्ये उद्घाटन

महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे महापालिका भवनामध्ये उद्घाटन

 महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे महापालिका भवनामध्ये उद्घाटन 

पिंपरी, ता. २२ जुलै २०२६ -  राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी (ता. २२) महापालिका भवनातील तिसऱ्या मजल्यावर ‘महापौर वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे’ उद्घाटन मा. डॉ. ओमप्रकाश शेटे (प्रमुख, आयुष्मान भारत योजना) यांच्या हस्ते पार पडले. या विशेष कक्षामुळे शहरातील गरजू आणि वंचित रुग्णांना वैद्यकीय मदत मिळणे अधिक सोपे व जलद होणार आहे. 

या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना महापौर निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचारांसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कक्षाद्वारे गरजू रुग्णांना महापौर निधीतून 5,000 रुपयांपर्यंतचे तात्काळ सहाय्य, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंतची केली जाणार आहे.  प्रत्येक गरजू नागरिकाला वेळेत उपचार आणि योग्य मदत मिळावी, हाच या उपक्रमामागील संकल्प आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली. 

याप्रसंगी आमदार अमित गोरखे,  आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांतजी शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शहराध्यक्ष,  भा.ज.पा., शत्रुघ्न काटे,  महिला व बालकल्याण सभापती राणीपठारे, गटनेते शिवसेना विश्वजीत बारणे,  नगरसदस्या अनुराधा गोरखे, सदाशिव खाडे, राम वाकडकर तसेच महापालिकेचे अधिकारी  उपस्थित होते.








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories