दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची घोषणा
दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची घोषणा
पिंपरी, ता. २२ जुलै २०२६ - शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची घोषणा केली आहे.
सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबत, प्रकाश आंबेडकर यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई ही लोकशाहीला न शोभणारी आहे. अशा दडपशाहीविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे.
'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा द्यावा.....
''दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. मी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन २३ जुलैच्या 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा द्यावा.'' - प्रकाश आंबेडकर
- शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचार, Education Sector Corruption, लाठीमार, Police Lathicharge, आंदोलन समर्थन, Protest Support
- नीट परीक्षा, NEET Exam, NEET Paper Leak, पेपरफुटी प्रकरण, Paper Leak Case
- दिल्ली विद्यार्थी आंदोलन, Delhi Student Protest, विद्यार्थी आंदोलन, Student Protest,
- प्रकाश आंबेडकर, Prakash Ambedkar, महाराष्ट्र बंद
- वंचित बहुजन आघाडी, Vanchit Bahujan Aaghadi, VBA