महापालिकेत प्रेवशासाठी 'स्वागतम् ई-पास' ऑनलाइन नोंदणी प्रणालीचा वापर करा, महापालिकेचे नागरीकांना आवाहन

महापालिकेत प्रेवशासाठी 'स्वागतम् ई-पास' ऑनलाइन नोंदणी प्रणालीचा वापर करा, महापालिकेचे नागरीकांना आवाहन

महापालिकेत प्रेवशासाठी 'स्वागतम् ई-पास' ऑनलाइन नोंदणी प्रणालीचा वापर करा, महापालिकेचे नागरीकांना आवाहन 

पिंपरी, ता. २५ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेशासाठी आता 'स्वागतम् ई-पास' ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरु करण्यात आली आहे. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १ मे २०२६ ते २५ मे २०२६ (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) या कालावधीत सुमारे ७ हजार ८९४ नागरिकांनी या प्रणालीचा लाभ घेतला आहे. या अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि डिजिटल प्रणालीचा नागरीकांनी वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

दिनांक १ मे २०२६ पासून महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेशासाठी ‘स्वागतम ई-प्रवेश’ ही ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे.

घरबसल्या नोंदणी,  नियोजित वेळेनुसार भेट, कमी प्रतीक्षा, ओटीपी व क्यूआर कोड आधारित सुरक्षित प्रवेश व्यवस्था ....ही या प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत. या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या https://pcmcindia.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. होमपेजवर दिलेल्या 'स्वागतम् ई-पास' (Swagatam E-Pass) या लिंकवर क्लिक करायचे आहे. तुमचा मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरायची आहे.  

नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईलवर प्रवेशासाठीचा एक 'क्यूआर कोड' येईल.  जर तुम्ही आगाऊ नोंदणी केली नसेल, तर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उपलब्ध असलेला कोड स्कॅन करूनही त्वरित पास मिळवता येतो. नागरिकांना ई-पास काढायच्या दिनांकापासून पुढील ७ दिवसांपर्यंतचे उपलब्ध दिनांक दिसतात. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी महापालिकेत बैठकीसाठी येणाऱ्या अभ्यागतांना संबंधित विभागाचे पत्र आणि भेटणाऱ्यांची नावे देणे आवश्यक आहे. नागरीकांनी या सुविधेचा वापर करावा, असे महापालिकेने सांगितले आहे. 








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories