राज्यभरात २५ जूनपासून ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’, मंत्री पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

राज्यभरात २५ जूनपासून ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’, मंत्री पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

राज्यभरात २५ जूनपासून ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’, मंत्री पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती 

पुणे, ता. १ - येत्या २५ जूनपासून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या 'नशामुक्त महाराष्ट्र अभियाना'मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस सुमारे १६० मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. तसेच बैठकीस महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच लोकप्रतिनिधी, पोलीस, महापालिका, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

बैठकीत लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक उद्याने, मैदाने, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच काही ठिकाणी अमली पदार्थांच्या वापरासंदर्भातील तक्रारी आणि सूचना मांडल्या. या सर्व बाबींची गांभिर्याने दखल घेत संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. शेलार यांनी दिले. नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक स्तरांवर व्यापक जनजागृती केली जाणार आहे. युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीकडे प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन जनजागृतीस हातभार लावावा, असे आवाहन सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केले.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories