पवना धरण १०० टक्के भरले, विसर्ग 9000 क्युसेक पर्यंत वाढवण्याची शक्यता
पिंपरी, ता. २६ जुलै २०२६ - सद्यस्थितीमध्ये पवना धरण १०० टक्के भरले असून, पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावर पाऊस पडत असून धरणामध्ये कमी/अधिक येवा प्राप्त होत आहे. पवना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता आज रविवारी (ता. २६) नदीपात्रामध्ये होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण व येवा पाहता हा विसर्ग 9000 क्युसेक पर्यंत टप्पाटप्प्याने वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती पवनानगर धरण प्रकल्प व्यवस्थापनाकडून रविवारी (ता. २६) सकाळी देण्यात आली.
त्याबाबतची आवश्यक माहिती विसर्गावेळी जलसंपदा विभागामार्फत देण्यात येईल. सततच्या होणाऱ्या पर्जन्यामुळे ओढे व नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होऊ शकते. नदीच्या सखल भागांमध्ये पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पवना नदी खोऱ्यातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
नदीपात्रातील आपले साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप तथा जनावरे नदीपात्रापासून सुरक्षित ठिकाणी इतरत्र हलवण्यात यावीत. कोणत्याही प्रकाराच्या अफवांना बळी न पडता, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व तालुका/ जिल्हा/ शहर प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे, असे पवनानगर धरण प्रकल्प व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
- पूर परिस्थिती, Flood Situation, नदीपात्र, Riverbed, पाण्याचा विसर्ग, Water Discharge, धरणातील पाणी, Dam Water Level
- धरण व्यवस्थापन, Dam Management, जलसंपदा विभाग, Water Resources Department, पावसाचा इशारा, Rain Alert, पूर इशारा, Flood Alert
- 9000 क्युसेक, 9000 Cusecs, पवना नदी, Pavana River, पवनानगर, Pavananagar
- पवना धरण १०० टक्के भरले, Pavana Dam 100 Percent Full