पिंपरी-चिंचवड | १९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्यांविरोधात दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या आहेत. दक्षिण महाळुंगे आणि वाकड परिसरात एकूण सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवायांमध्ये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य मिळून आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.५० वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मोईजवळ, महाळुंगे ते तळवडे रस्त्यालगत असलेल्या महिंद्रा गेट क्रमांक दोनसमोर करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई राजेश वसंत गिरी यांनी फिर्याद दिली आहे. मोहंमद अल्लाउद्दीन अन्सारी (वय ३० वर्षे, रा. डोंगरवस्ती, मोई), श्रीकांत कृष्ण बेळमकर (वय ४९ वर्षे, रा. खंडोबा माळ, चाकण) आणि तेजस शिवराम कदम (वय ३२ वर्षे, रा. चाकण-तळेगाव रोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे तिघे पत्ती नावाचा जुगार खेळून लोकांकडून पैसे घेत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांच्याकडे ९००० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य मिळून आले. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८५९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३५ वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील महादेव कॉलनीतील कांतीलाल गुजर हॉस्टेलच्या तळमजल्यावरील मोकळ्या जागेत करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई अभिषेक शरद मांडे (वय २७ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. राकेश देवसन रॉय (वय ३२ वर्षे), किशोर कुमार जितेंद्र दास (वय २७ वर्षे), महेश गंगाई दास (वय ३६ वर्षे) आणि रामसुधाकर केदार रॉय (वय ४३ वर्षे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडे ३,९०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य मिळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४०/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) नुसार कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.