पिंपरी-चिंचवड : गणपतीच्या सजावटीसाठी घरात प्रवेश मिळवून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना सुस परिसरात घडली आहे. घरातील बेडरूममधील कपाटाचा ड्रॉवर उचकटून चोरट्यांनी हजारो किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधना दिलीप अलोने (वय 57, व्यवसाय गृहिणी) या सुस येथील निया सोसायटी परिसरात राहतात. 12 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते 21 नोव्हेंबर 2026 च्या कालावधीत ही चोरी झाली.
गणपतीनिमित्त राहण्यासाठी आलेल्या आरोपींनी तक्रारदार साधना यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूममधील कपाटाचा ड्रॉवर उचकटून त्यामधील सुमारे 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणी साधना अलोने यांनी दिलेल्या तक्रारीवरून 21 नोव्हेंबर 2026 रोजी बावधन पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला चिमणे, श्वेता ऊर्फ पौर्णिमा चिमणे आणि हिमांशू चिमणे अशी या आरोपींची नावे आहेत.
भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) आणि भादवि कलम 380 अन्वये बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.