भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार जखमी, चालक फरार

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार जखमी, चालक फरार

पिंपरी-चिंचवड : वाकड परिसरात भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला असून याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शरद बाळू गायकवाड (वय 34) हे खासगी नोकरी करतात. 13 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी सुमारे 3.15 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मोटारसायकलवरून हिंजवडीच्या दिशेने जात होते. यावेळी वाकड येथील हिंजवडी कस्पटे कॉर्नर मार्गावरील निलकमल होम्स दुकानासमोर पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अज्ञात चालक रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात आणि बेदरकारपणे वाहन चालवत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेमुळे तक्रारदार दुचाकीसह रस्त्यावर पडला. त्यात त्याच्या उजव्या पायाला मार लागून दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.

या प्रकरणी शरद गायकवाड यांनी 21 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, भारतीय न्याय संहिता बी. एन. एस. कलम  281, 125(अ), 324(4) आणि मो. व्हे. ॲक्ट कलम 184, 134(अ)(ब), 119, 177 आणि भादवी कलम 279, 337, 427 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिरसाट या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories