भोसरीत स्टीलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला ; 1.76 लाखांचा ऐवज लंपास

भोसरीत स्टीलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला ; 1.76 लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी-चिंचवड : भोसरी परिसरात स्टीलच्या दुकानाला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1 लाख 76 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी  मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र कालिदास कांकरीया (वय 43, व्यवसाय स्टील व्यवसाय) यांचे भोसरी येथील गव्हाणे वस्ती, परिसरात नमो स्टील नावाचे दुकान आहे. 20 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.15 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली.

या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शेडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील एकूण 1 लाख 76 हजार रुपये किमतीचे स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, तांबे, पितळ यांसह इतर साहित्य स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेले.

दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच महेंद्र कांकरीया यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार 21 नोव्हेंबर 2026 रोजी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 आणि भादवि कलम 380 अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories