पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरवमधील शिवरामनगर येथे नदीपात्रालगत लोखंडी कोयता बाळगल्याच्या आरोपावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात एका 18 वर्षीय युवकासह अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
15 नोव्हेंबरला सायंकाळी 6.40 च्या सुमारास ही घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींकडे 500 रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता आढळला. संबंधित आरोपींमधील 18 वर्षीय तरुणाचे नाव सिकंदर कुमार नडगिरी असे आहे. तर, अल्पवयीन मुलाचे नाव गोपनीयतेच्या कारणास्तव उघड करण्यात आलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तालयाच्या हद्दीत 11 ते 24 नोव्हंबरदरम्यान शस्त्रे बाळगण्यावर प्रतिबंधक आदेश लागू असताना त्या आदेशाचा भंग करून शस्त्र बाळगल्याचा आरोप नोंदविण्यात आला आहे.
पोलीस हवालदार प्रकाश शिंदे यांनी ही तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सांगवी पोलीस ठाण्यात 15 नोव्हेंबर रोजी शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सांगवी पोलीस हवालदार गोडे तपास पुढील तपास करत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणावर हल्ला, मारहाण किंवा धमकी दिल्याची माहिती समोर आलेली नाही.