सांगवीत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन ; पोलिसांकडून दोघांवर कारवाई

सांगवीत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन ; पोलिसांकडून दोघांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड : जुन्या सांगवीत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दोनजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या सांगवीतील औंध जिल्हा रुग्णालय, आयुष हॉस्पिटल परिसरात 15 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. हॉस्पटलसमोरल समोरील मोकळ्या जागेत एक १९ वर्षीय तरुण आणि अल्पवयीन मुलगा कोयता घेऊन वावरताना आढळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लागू आयुक्तालयाच्या हद्दीत ११ ते २४ नोव्हेंबरदरम्यान शस्त्रे बाळगण्यास मनाई लागू करण्यात आली होती. मात्र, हा आदेश भंग करून जवळ धोकादायक शस्त्र बाळगल्याचा आरोप संबंधितांवर आहे. अनिकेत संजय आल्हाट असे (वय 19) एका आरोपीचे नाव आहे. तर अल्पवयीन मुलाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

संबंधितांकडे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता पोलिसांना आढळून आला. या प्रकरणी सांगवी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक निशांत काळे यांनी तक्रार दिली आहे. शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार १५ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ढवळे करीत आहेत. 







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories