महापालिका शाळेतील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची आमदार अण्णा बनसोडे यांची ग्वाही

महापालिका शाळेतील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची आमदार अण्णा बनसोडे यांची ग्वाही

महापालिका शाळेतील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची आमदार अण्णा बनसोडे यांची ग्वाही 

पिंपरी, ता. २५ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात मानधन  तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी आमदार अण्णा बनसोडे यांची त्यांच्या पिंपरी येथील कार्यालयात भेट घेतली. शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन बनसोडे यांना सादर केले.

फेरनियुक्ती, वेतनवाढ व सेवेला स्थैर्य मिळावे, या प्रमुख मागण्या यावेळी शिक्षकांनी मांडल्या. गेली अनेक वर्षे अत्यल्प मानधनावर सेवा देत असतानाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी हे शिक्षक सातत्याने कार्यरत आहेत, असे या शिक्षकांनी सांगितले. 

आमदार बनसोडे यांनी शिक्षकांचे प्रश्न संवेदनशीलतेने समजून घेतले. त्याबाबत संबंधित प्रशासनाशी चर्चा करुन शिक्षकांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही  आमदार बनसोडे यांनी दिली. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories