news
clock
'पीएमपी' बसच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मत्यू

'पीएमपी' बसच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मत्यू

'पीएमपी'च्या बसच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मत्यू 

पिंपरी, ता. १२ - आळंदी येथे 'पीएमपीएमएल'च्या बसच्या मागच्या चाकाखाली सापडून एका तरुणाचा सोमवारी (ता. ११) मृत्यू झाला आहे. या बसचालकावर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी येथील 'पीएमपी'च्या बस स्थानकावर दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत, हवालदार राजेंद्र विक्रम कोल्हे (वय ४१ वर्षे) यांनी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बसचालक हनुमान ज्ञानोबा जाधव (वय-२७ वर्षे) हा त्याच्या ताब्यातील बस आळंदी पीएमटी स्टॉप येथे पार्क करत होता. मात्र, तो हयगयीने, निष्काळजीपणाने बस चालवत होता. त्यामुळे, अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाचा तरुण बसच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडला. बसचे चाक त्या तरुणाच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. 

या प्रकरणी पीएमपीच्या बसचालकावर आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०६ (१),२८१, प्रमाणे भादवि कलम २७९ ३०४ क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories