पिंपरी-चिंचवड : मुळशी तालुक्यातील पुनावळे परिसरात किरकोळ वादाचा रागातून एका महिलेला मारहाण करून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. पुनावळे थील गायवाड नगरमधील पुणाई भोजनालय हॉटेल परिसरात एका महिलेलवा शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तिच्या डोक्यात लाकडे फळीने वार करण्यात आला.
तक्रारदार महिला आर्सिया सिकंदर 37 वर्षीय असून त्या मजुरीचे काम करतात. 20 नोव्हेंबरच्या दुपारी आरोपी शहबाज वालीया यांच्याशी त्यांचा किरकोळ वाद झाला. या किरकोळ वादाचा राग शहबाज यांनी मनात धरला होता. त्यानंतर संध्याकाळी 6.30 च्या सुमारास त्यांनी आर्सिया यांना हाताने मारहाण कण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी जवळच असलेली लाकडी फळी आर्सिया यांच्या डोक्यात मारली. या हल्ल्यात आर्सिया यांच्या डोक्याला दुखापत झाली.
या घटनेप्रकरणी 21 नोव्हेंबर 2026 रोजी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 189, 191(2), 352 तसेच भादंवि कलम 323, 324 आणि 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस ठाण्याचे हवालदार सगर करत आहेत.