रिक्षाचालकांच्या हक्कासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा जनसंवाद
पिंपरी, ता. १० ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्या समजून घेण्यासाठी 'महाराष्ट्र रिक्षा पंचायत' च्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये भेटी जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान रिक्षाचालकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जात असून त्यांच्याशी थेट संवाद साधला जात आहे.
टू-व्हीलर टॅक्सीला विरोध : रिक्षाचालकांच्या हक्कावर परिणाम करणाऱ्या बेकायदेशीर टू-व्हीलर टॅक्सीविरोधातील भूमिका, १५ ऑगस्टपासून मीटर सुरू करणे: पिंपरी-चिंचवड शहरात आगामी १५ ऑगस्टपासून रिक्षा मीटर सुरू करणे व रिक्षाचालकांच्या सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणी याबाबत चर्चा केली जात आहे.
या महत्त्वपूर्ण जनसंवाद मोहिमेत महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे सर्व शिलेदार व पदाधिकारी सहभागी होत आहेत. शुभम तांदळे (युवक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत), अनिल शिरसाट (रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख), संतोष नाना गुंड (पुणे जिल्हाध्यक्ष), धनंजय कुदळे (महाराष्ट्र प्रवक्ते), अशोक तात्या ठाकूर (पुणे ग्रामीण अध्यक्ष), प्रदीप अय्यर (विद्यार्थी वाहतूक शहराध्यक्ष), विशाल ससाने (शहर युवक अध्यक्ष), भाऊसाहेब शेलार (उपाध्यक्ष), अशोक ठाकूर (पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष), संदीप कुरुंद (पिंपरी चिंचवड शहर सल्लागार), पप्पू वाल्मिकी (विभागीय सचिव), उमाकांत शिंदे (भुमकर चौक विभाग अध्यक्ष), किशोर कांबळे (रिक्षा ब्रिगेड कार्याध्यक्ष, ताथवडे), सागर जाधव (पुनावळे विभाग अध्यक्ष), विशेष उपस्थिती: गणेश कुठे, भीमा कसबे, अशोक शिंदे, आमीन पठाण, किरण पांचाळ, मारुती शेळके, तोफिक शेख, शशिकांत पात्रे, अर्जुन मोरे, सोमनाथ शिंदे, नितीन होळे, महादेव शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोहिमेत सहभागी होत आहेत.