news
clock
दुकानदाराला तरुणाकडून लाकडी दांडक्याने मारहाण

दुकानदाराला तरुणाकडून लाकडी दांडक्याने मारहाण

 दुकानदाराला तरुणाकडून लाकडी दांडक्याने मारहाण 

पिंपरी, ता. २४ - कोणत्यातरी छोट्याशा कारणावरुन एका दुकानदाराला एका तरुणाने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील निघोजे येथे गुरुवारी (ता. २३) घडला आहे. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावली आहे. 

याबाबत मारहाण झालेले दुकानदार संदिप एकनाथ हुळवळे (वय ३८ वर्षे, रा. निघोजे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणारा आरोपी सचिन शिंदे (रा. सुभाषवाडी, निघोजे, ता. खेड) याला भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.एस.) कलम ३५ (३) प्रमाणे नोटिस देण्यात आली आहे

निघोजे येथे गुरुवारी (ता. २३) दुपारी १२ च्या सुमारास फिर्यादी संदिप हे त्यांच्या किराणा दुकानात काम करत होते. आरोपीने तेथे येऊन विनाकारण संदिप यांना म्हटले की,  ''फापाळे यांच्या बिल्डींगमध्ये पाणी सोडण्यास आलेल्या टॅंकरने माझ्या बिल्डींगची वायर तुटली आहे, ते भरुन दे.'', असे बोलून  शिवीगाळ करुन त्यांनी संदिप यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.  

आरोपीविरोधात दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम ११८ (१), ३५१ (२), ३२४ (२), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories