डॉ. स्मिता जाधव यांचा सोलापूर प्रचार दौरा; पदवीधरांशी संवाद

डॉ. स्मिता जाधव यांचा सोलापूर प्रचार दौरा; पदवीधरांशी संवाद

सोलापूर | पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी-महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी सोलापूर शहर आणि परिसरात प्रचार दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी धार्मिक स्थळांना भेटी देण्यासह शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, पदवीधर मतदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन या प्रचार दौऱ्याला लाभल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.


डॉ. जाधव यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर आणि मार्कंडेय मंदिर येथे दर्शन घेतले. त्यानंतर अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी मंदिर (होटगी मठ) येथे भेट देऊन जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीमुळे कामासाठी नवी ऊर्जा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रचार दौऱ्यादरम्यान डॉ. जाधव यांनी दक्षिण सोलापूरचे आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संपर्क मोहीम, बूथनिहाय तयारी आणि मतदानाच्या दिवशीचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली.


तसेच श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था, वालचंद महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय आणि शेळगी परिसरात त्यांनी भेटीगाठी घेतल्या. यावेळी पदवीधरांच्या रोजगारासंबंधी प्रश्नांवर चर्चा झाली. दशरथ गाडे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

या दौऱ्यात भाजपच्या सोलापूर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, काशीपीठाचे विश्वस्त डॉ. शैलेश पाटील, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, मनीष देशमुख, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, मंडल अध्यक्ष अर्जुन जाधव आणि महेश देवकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पदवीधरांचे रोजगाराचे प्रश्न, शिक्षण आणि तरुणांच्या भविष्यासाठी काम करण्याच्या मुद्द्यांवर प्रचारात भर देण्यात आला. यावेळी महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना पहिल्या पसंतीक्रमाचे मत देण्याचे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories