news
clock
तळेगाव दाभाडे येथे यात्रेत महिलेच्या गळ्यातील दागिन्याची चोरी, तीन महिलांना अटक

तळेगाव दाभाडे येथे यात्रेत महिलेच्या गळ्यातील दागिन्याची चोरी, तीन महिलांना अटक

तळेगाव दाभाडे येथे यात्रेत महिलेच्या गळ्यातील दागिन्याची चोरी, तीन महिलांना अटक 

पिंपरी, ता. २१ - तळेगाव दाभाडे येथे डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवात एका महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचा सोन्याचा दागिना व रोख रक्कम गुरुवारी (ता. १९) चोरीला गेली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत, संबंधित महिला योगिता प्रमोद भदाणे (वय २९ वर्षे, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तक्रार दिली. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी योगिता या यात्रेसाठी मंदिर परिसरात गेल्या होत्या. यात्रेत एका महिलेने त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचा सोन्याचा दागिना तसेच रोख रक्कम चोरुन नेली.

योगिता यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी सोनाली रामदास डुकळे उर्फ सुनिता जाधव (वय ३२), वनिला संजय जाधव (वय २५) व रेणुका राहुल पवार (वय ३३, सर्व रा. चंदननगर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. 

आरोपींविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) व भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस  पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories