news
clock
सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला शिरुरमधून अटक,  ८९ हजार ५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला शिरुरमधून अटक, ८९ हजार ५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला शिरुरमधून अटक,  ८९ हजार ५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त 

पिंपरी, ता. २३ - सार्वजनिक बसमध्ये लहान मुलांना घेवून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीस गुन्हे शाखा युनिट-३ ने शिरुरमधून अटक केली. आरोपी महिलांकडून ८९ हजार ५००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे.

एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता - २०२३ च्या कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने दाखल गुन्ह्यातील घटनास्थळापासून शिक्रापूरपर्यंत जाणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांच्या आजूबाजूचे सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त केले. त्याद्वारे तसेच गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे संशयित महिला आरोपींचा शोध सुरु असतांना सदर गुन्हयातील महिला आरोपी शिरुर तालुक्यातील जातेगांव येथे राहत असल्याचे समजले. त्याठिकाणी सापळा लावून नमूद गुन्ह्यातील संशयित महिला आरोपींना महिला सहाय्यक कक्षाकडील  सहाय्यक पोलिस निरीक्षक गोडबोले, हवालदार सोनवणे, पोलिस शिपाई भोर यांच्या मदतीने ताब्यात घेतले.

या आरोपी महिलांकडे नमूद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी अनुरधा ऊर्फ पार्वती मंगेश बुध्दिनाथ (वय ३० वर्षे), अंजली राम बुध्दिनाथ (वय २१ वर्षे), राधा चरण वैद (वय २१ वर्षे), कल्पना बाला वैद (वय २१ वर्षे), श्वेता उमर वैद (वय २१ वर्षे) व जानकी अनिल वैद (वय ३० वर्षे) या महिला गुन्ह्यात सहभागी होत्या. सदर महिला आरोपींकडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

ही कामगिरी डॉ. शशिकांत महावरकर (अपर पोलीस आयुक्त), सारंग आवाड (पोलीस उप-आयुक्त गुन्हे),  डॉ. शिवाजी पवार (सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे), डॉ. विशाल हिरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे   गुन्हे शाखा युनिट - ३ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गोडबोले, पोलिस उपनिरीक्षक सुनिल जावळे, हवालदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सुर्यवंशी, मनोज साबळे व सोनवाने, गोनटे, पोलिस शिपाई स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे, तुषार वराडे, समिर काळे, सुंदर थोरात, सुधिर दांगट, निखिल फापाळे, राजकुमार इघारे, भोर तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेकडील फौजार माळी, हवालदार ३०६८ ननावरे, पोलिस शिपाई ४२४० कारके, २३२६ हुलगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories