टिपू सुलतान जयंतीसाठी महापालिकेने विशेष निधी द्यावा ; नरेंद्र बनसोडेंची मागणी

टिपू सुलतान जयंतीसाठी महापालिकेने विशेष निधी द्यावा ; नरेंद्र बनसोडेंची मागणी

पिंपरी : म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा विशेष निधी मंजूर करावा. तसेच आगामी अर्थसंकल्पात दरवर्षी जयंती उत्सवासाठी स्वतंत्र निधीची कायमस्वरूपी तरतूद करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात निवेदनही पाठवण्यात आले आहे. 

टिपू सुलतान यांचे ऐतिहासिक कार्य, शौर्य आणि ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ औपचारिक अभिवादन कार्यक्रम न घेता ऐतिहासिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रबोधनाचे विविध उपक्रम आयोजित करावेत, अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे.

यंदाच्या जयंतीनिमित्त शहरस्तरीय अभिवादन कार्यक्रम, ऐतिहासिक संदर्भांवर आधारित व्याख्यानमाला, ऐतिहासिक छायाचित्रांचे प्रदर्शन आणि डिजिटल माहिती प्रदर्शन आयोजित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक सलोखा, सर्वधर्मीय ऐक्य आणि बंधुतेचा संदेश देणारे कार्यक्रमही राबवावेत, असे काँग्रेसने सुचविले आहे.

नरेंद्र बनसोडे म्हणाले, “इतिहासातील शौर्य, स्वाभिमान आणि संघर्षाची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिकेने यंदाच्या जयंतीसाठी विलंब न करता विशेष निधी मंजूर करावा. तसेच आगामी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करून शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम नियमितपणे राबवावेत.”

महापालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निधी मंजूर करावा आणि त्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories