युनिफाइट राज्यस्तरीय स्पर्धेत अल्टिमेट स्पोर्ट्स & मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंची दमदार कामगिरी; ९ पदकांची कमाई
युनिफाइट राज्यस्तरीय स्पर्धेत अल्टिमेट स्पोर्ट्स & मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंची दमदार कामगिरी; ९ पदकांची कमाई
पिंपरी-चिंचवड : वाई, सातारा येथे २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या १४ वी राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये अल्टिमेट स्पोर्ट्स व मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ९ पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत अल्टिमेट स्पोर्ट्स & मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंनी २ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदके मिळवत आपल्या संघाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
सुवर्णपदक :
🥇 शौर्य नेगी
🥇 विवेक डेढे
रौप्यपदक :
🥈 शरयू धुमाळ
🥈 धनश्री शिंपले
🥈 श्रेया कदम
🥈 श्रुतिका मोरे
कांस्यपदक :
🥉 अदिती तांबे
🥉 माही तावरे
🥉 रोहन यादव
खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट तंत्राचे, शिस्तीचे, मेहनतीचे आणि लढाऊ वृत्तीचे प्रदर्शन करत ही उल्लेखनीय कामगिरी केली.
या खेळाडूंना संस्थेचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक श्री. अविनाश पवार तसेच वरिष्ठ प्रशिक्षक श्री. आदित्य पवार यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणातून, शिस्तबद्ध सरावातून आणि योग्य मार्गदर्शनातून खेळाडूंनी हे यश संपादन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरी-चिंचवडचे मा. स्वीकृत नगरसेवक श्री. नवनाथ नढे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे कौतुक करत त्यांनी भविष्यात खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अल्टिमेट स्पोर्ट्स व मार्शल आर्ट्सचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.