news
clock
गतवर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत

गतवर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत

गतवर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत 

पुणे, ता. ८ - गतवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानापोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. 

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त  झाले. यामध्ये चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होता.  यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.  

तसेच जानेवारीपासून ते आत्तापर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा सुरु आहे. जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २,३३,८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यु आणि नऊ लोक जखमी झाले. अवकाळी पावसामुळे ३६ जनावरांचाही मृत्यु झाला आहे. एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पावसानेही १,९४,३२९ शेतकऱ्यांच्या १,२२,९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories