दुरुस्तीच्या कामांसाठी वरंधा घाट ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार
पुणे, ता. २८ - रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा.... वरंध घाटातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे वरंध घाट २५ मार्चपासून ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात जितेंद्र डुडी (जिल्हाधिकारी पुणे) यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूनचनेत म्हटले आहे की, पुणे जिल्हा हद्दीतील हिरडोशी परिसरात रस्त्याची दुरुस्ती, मजबुतीकरण तसेच सुरक्षेसाठी आवश्यक कामे हाती घेण्यात आली आहेत. घाटातील काही ठिकाणी रस्त्याची अवस्था खराब झाल्याने अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
घाटातील वाहतूक बंदी २५ मार्चपासून लागू झाली असून ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी तसेच पर्यटकांनी या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.