क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाची 1.37 कोटींची फसवणूक

क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाची 1.37 कोटींची फसवणूक
क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाची 1.37 कोटींची फसवणूक

भोसरी | २८ ऑगस्ट २०२६ : क्रिप्टोकरन्सीमध्ये भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष एका व्यावसायिकाला तब्बल १.३७ कोटी रुपयांना महागात पडले. याप्रकरणी आशुतोष संजय उन्हाळे आणि समाधान शंकर कदम यांच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अमित रामभाऊ लांडगे (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ मे २०२४ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडली. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळेल, असे सांगितले. आकर्षक परताव्याचे आश्वासन देत त्यांनी फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे स्वीकारले.


फिर्यादीने आरोपींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून विविध व्यवहारांद्वारे एकूण १ कोटी ३७ लाख ५७ हजार ८६३ रुपये गुंतवले. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम मिळाली नाही. पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.


याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३५१(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मांजरे करीत आहेत. अधिक परताव्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित कंपनी किंवा व्यक्तीची अधिकृत माहिती तपासावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories