चिंचवड येथील स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसाय आला उघडकीस

चिंचवड येथील स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसाय आला उघडकीस

चिंचवड येथील स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसाय आला उघडकीस 

पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने चिंचवड येथील एका स्पा सेंटरवर छापा टाकून वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघड केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

 अटक आरोपीचे नाव शाहनवाज माहमुद रिफाई (वय ४१ वर्षे, सध्या रा. फ्लॅट न २०२, आदित्य बिल्डींग, गोडांबे चौक, रहाटणी) असे आहे.

ही कारवाई ११ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८:५२ वाजता “VIVANT Family Thai Spa”, प्रिमियर प्लाझा मॉल, दुसरा मजला, ए विंग, जुना पुणे-मुंबई हायवे, चिंचवड येथे करण्यात आली. या ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकारातून मिळालेल्या पैशांवर स्वतःचा उदरनिर्वाह करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर स्पा परिसराच्या आसपास वैद्यकीय क्लिनिक आणि डोळ्यांचे रुग्णालय यांसारखी सार्वजनिक ठिकाणे असतानाही, या ठिकाणी अवैध कृत्य सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध चिंचवड पोलिस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १४३ (३) ३ (५) व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५,७ प्रमाणे, भारतीय दंड विधान  कलम ३७० ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories